धनुष्यबाणाचे बटन दाबून बारणे यांना बहुमताने निवडून दया. ♦️आमदार महेश बालदी यांचे जनसंवाद मेळाव्यात आवाहन.

 

लोकदर्शन उरण👉विठ्ठल ममताबाद

उरण दि ११ मे देशभरात मोदींच्या नेतृत्वात झालेले कार्य कणखर आणि सक्षम असेच आहे त्यामुळे नरेंद्र मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत.पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मावळ लोकसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे (निशाणी धनुष्यबाण )यांना बहुमताने निवडून दया असे आवाहन उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरण येथे केले. ३३ लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक १३ मे २०२४ रोजी होत आहे. या निमित्ताने उरणकरांसोबत विकासाचा जनसंवाद साधण्यासाठी शुक्रवारी १० मे रोजी सायंकाळी उरण येथील नगरपालिकेच्या तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक शाळेच्या मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आमदार महेश बालदी हे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भोईर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पिंगळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष रवी भोईर, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, आरपीआयचे तालुका अध्यक्ष संजय गायकवाड, माऊली घोगरे तसेच सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार महेश बालदी म्हणाले की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून मोदी सरकारने व महाराष्ट्र सरकारने विकासाचा झंझावात या तालुक्यात लावला. हे मी जबाबदारी सांगतो. की अख्या महाराष्ट्रात कुठे विकास झाला नाही एवढा विकास या ठिकाणी झाला. आठ वर्षापूर्वी आपण उरण पनवेलला जायचो, तेव्हा जीव मुठीत असायचा. हे सर्वांनी अनुभवलय. रेल्वेचे काम आम्ही हाती घेतले. पाठपुरावा केला. फॉरेस्टची सर्व प्रकरणे सोडविली. आणि रेल्वे लवकरच सुरू केली. मला अभिमान आणि गर्व वाटतो की, साडेबावीस हजार ते पंचवीस हजार प्रवासी आज उरण नेरूळ असा रेल्वेचा प्रवास करत आहे. उरणहून सरळ व्ही. टी. पर्यंत रेल्वे सुरू करायला पाहिजे. हे ही आपले स्वप्न लवकरच पूर्ण होईल असेही ते म्हणाले. जात धर्म पंथ भाषा हे कधी बोलतात तर जेव्हा त्यांच्याकडची विकासाची हत्यारे संपतात. तेव्हा बोलतात. परंतु आपल्याकडे विकासावर बोलण्यासारखे भरपूर आहे. नगरपालिकेसाठी १०० कोटी आणले. यांनी दहा कोटी तरी आणायचे होते. त्यांचे मुख्यमंत्री होते. सत्तेत आमदार होते. पण काही आणायचं नाही आणि काही करायचं नाही फक्त टीका टोमणे मारायचे. विरोधक भाषणात विकासाचा एक शब्द बोलत नाहीत. फक्त भाजपा कसा वाईट आहे. हे टीका, टोमणे मारून, भाजपवर टीकेचे प्रहार करत राहायचे. एक समृद्ध संपन्न भारत बनवायचा आहे. आत्ताच चौकला आदिवासी पट्ट्यात नितीन गडकरींना ऐकण्यासाठी १२००० लोक उपस्थित होत. एअरपोर्टला मोदी आले. तेव्हा दीड लाख लोक होते. हि आमची ताकद आहे. जिथे आम्हाला आमची ताकद दाखवायची आहे. तिथे आम्ही दाखवतो. नरेंद्र मोदीजींनी आपल्याला काय दिले. आणि त्यांना आपण काय देणार आहोत यासाठी उरणकरांसाठी हा विकासाचा जनसंवाद आहे. आपकी बार ४०० पार या ४०० मध्ये खासदार श्रीरंग बारणे असायला हवेत. यासाठी खासदार बारणे यांना निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे. असेही त्यांनी सांगितले. दरम्यान लोकनेते दि बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, उरणकरांच्या स्वप्नातलं रुग्णालय, उरण बायपास रस्ता, पिरवाडी समुद्र किनाऱ्याचे सुशोभीकरण, चारफाटा येथील मच्छी मार्केटची उभारणी, केगाव दांडा रस्ता, त्याचबरोबर उरण नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या विकासक्रमांमध्ये उरण नगर परिषदेची नवीन शासकीय इमारत, उरण शहरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण, फुल मार्केट, समाज मंदिर, नाट्यगृह तसेच मल्टिप्लेक्स थेटर आदी विकास कामे सुरू असल्याचा उल्लेख आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *