,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा.अशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगढ सिमेंट वर्क्स आपल्या सामाजिक दायित्वाचा विचार करून गावातील लोकांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करत असते. समाजाचा चारही बाजूंनी विकास झाला पाहीजे यासाठी सतत प्रयतनशील असते. असाच एक कार्यक्रम घरेलू आग सुरक्षा या विषयावर बॉम्बेझरी येथे नुकताच पार पाडला.गावकऱ्यांना आग लागल्यास काय उपाययोजना केली पाहिजे व स्वताची सुरक्षा कशी केली पाहिजे या विषयावर माणिकगढ च्या अग्नीशमन पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गावकर्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आणि काही प्रात्यक्षिक दाखविले .सुरक्षा हाच अंतिम उपाय आहे याचे महत्व समजावून सांगितले
व मार्गदर्शन झाल्यानंतर गावकर्यांना आग सुरक्षा यावर प्रश्न विचारण्यात आले योग्य उत्तर देणार्या लोकांना पारितोषिक देण्यात आले ६४ गावकर्यांनी उपस्थित राहून मोठ्या
उत्साहात या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात गावातील जेष्ठ नागरिकांसोबत महिला, पुरुष, छोटी मुले उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये गावातील सरपंच श्रीमती मनीषा पेंदोर ,गावातील पोलीस पाटील साधना नागोसे ,माजी सरपंच श्रीमती लता उईके व गावकऱ्यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले. तर माणिकगढ सि एस आर टीम ने अथक प्रयत्न केले.