By : Avinash Poinkar
चंद्रपूर :
आयएसओ मानांकित तथा पंचायत राज पुरस्कृत पंचायत समिती चंद्रपूर व बल्लारपूर तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा तर्फे पंचायत समिती चंद्रपूर येथील सभागृहात रक्तदान शिबीर नुकतेच पार पडले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रशासक तथा गटविकास अधिकारी धनंजय साळवे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी नितीन फुलझेले, गणेश चव्हाण, ग्रामसेवक युनियन शाखेचे किशोर धकाते, रविंद्र चावरे उपस्थित होते.
एप्रिल, मे महिन्यात आरोग्य विभागात रक्ताचा तुटवडा जाणवतो. अशावेळी आवश्यक गरजूंना रक्तांचा पुरवठा व्हावा या हेतूने गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकुण ५६ पंचायत समितीचे कर्मचारी, ग्रामसेवक कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. शिबीराच्या यशस्वितेसाठी पंचायत समीती व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामसेवक युनियनने परिश्रम घेतले.
•••
सन्मानपत्राचा आदर्श
रक्तदान शिबीरात रक्तदान करणा-या कर्मचा-यांचा पंचायत समीतीतर्फे सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. प्रयोगशील गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी सन्मानपत्रावर भारतीय संविधानाची उद्देशिका व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित राष्ट्रवंदना यास स्थान दिले. त्यामुळे हे सन्मानपत्र कर्मचारी व अधिका-यांना चांगलेच भावले. हे आदर्श सन्मानपत्र ठरले.
•••