लोकदर्शन 👉 प्रा.अशोक डोईफोडे
चंद्रपूर :– जिल्हा काँग्रेस कमिटी चंद्रपूर आणि शहर काँग्रेस कमिटी चंद्रपूर ची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली एन. डी. होटेल, चंद्रपूर येथे पार पडली.
यावेळी जिल्हाध्यक्षांनी चंद्रपूर जिल्हातील सर्व तालुका काँग्रेस कमेटी च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून सध्या स्थितीत पक्षाची वाटचाल, लोकसभा निवडणुकीतील कामगिरी, कार्यकर्त्यांच्या अडचणी, स्थानिक समस्या, पक्ष बळकटीसाठी आवश्यक उपक्रम अशा विविध विषयांवर चर्चा केली. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस तसेच इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षातील राष्ट्रीय, प्रादेशिक, जिल्हा तथा स्थानिक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी काँग्रेस उमेदवार श्रीमती धानोरकर यांना निवडून आणण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, परिश्रम घेतले याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत श्रीमती प्रतिभाताई धानोरकर प्रचंड बहुमताने निवडून येणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आनखी एकजुटीने काम करून सहाही विधानसभा मतदारसंघ विजयश्री खेचून आणण्यासाठी संकल्पबध्द होऊन कामाला लागण्याचे आवाहन केले तर श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी सुध्दा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी वडिलांप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अहोरात्र परिश्रम घेतले तसेच काँग्रेस तसेच इंडिया तथा महाविकास आघाडी च्या सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी विशेष सहकार्य करुन लोकसभा निवडणुकीत मदत केल्याबद्दल आभार मानले. या प्रसंगी बंडू धोतरे, डॉ. अभिलाषा गावतुरे, राजुभाऊ झोडे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी चंद्रपूर – १३ लोकसभा मतदार संघाच्या इंडिया तथा महाविकास आघाडी च्या लोकप्रिय उमेदवार आमदार श्रीमती प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश तिवारी, माजी आमदार अविनाश वारजुरकर, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, विनायक बांगडे, अँड. विजय मोगरे, महिला काँ. शहराध्यक्षा चंदाताई वैरागडे, माजी महापौर संगिता अमृतकर, इंटक कामगार नेते के. के सिंग, अंबिकाप्रसाद दवे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, घनश्याम मुलचंदाणी, प्रशांत काळे, विजय गावंडे, खेमराज तिडके, विजयराव बावणे, रंजन लांडे, एजाज अहमद, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, प्रदेश महासचिव अश्विनी खोब्रागडे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खणके, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी सभापती दिनेश चोखारे, अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोहेल रजा शेख, कार्याध्यक्ष मतीन कुरेशी, किसान काँ. जिल्हाध्यक्ष दिपक वाढई, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, माजी महिला काँ. अध्यक्ष चित्राताई डांगे, सुनीता अग्रवाल, अश्विनी खोब्रागडे, चंद्रपूर शहर यु. काँ. जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, माजी शहराध्यक्ष नंदु नागरकर, प्रदेश प्रतिनिधी प्रविण पडवेकर, गुरू गुरूनुले, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शफाक शेख, यु. काँ. प्रदेश सचिव कुणाल चहारे, यासह जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. संचालन महेश तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन चंद्रपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष रितेश तिवारी यांनी मानले.