By : Shankar Tadas
गडचांदूर : गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वार संचालित महात्मा विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारला इंग्रजी साहित्यातील जगप्रसिद्ध लेखक व नाटककार विल्यम शेक्सपिअर यांची जयंती ‘इंग्लिश डे’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्राचार्या तथा मुख्याध्यापिका स्मिता चिताडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, केंद्रप्रमुख पंढरीनाथ मुसळे व पर्यवेक्षक शंकर तुराणकर यांची मंचावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. माहुरे यांनी या महान इंग्रजी लेखकाबाबत माहिती दिली व इंग्रजी भाषेचे महत्व पटवून दिले व इंग्रजी भाषा बोलण्याचा सराव कसा करावा याचे मागदर्शन केले. या जयंतीनिमित्ताने विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये इंग्रजी व्याकरणावर आधारित पोस्टर तयार करणे, इंग्रजी व्याकरणावर आधारीत बहुपर्यायी प्रश्नांचा पेपर व बोधकथा सांगणे या तीन स्पर्धा प्रामुख्याने घेण्यात आल्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या स्मित चिताडे यांनी मार्गदर्शन केले ज्यामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन व लेखनाचे महत्त्व लक्षात आणून स्वतःमध्ये कसे अनुकूल बदल घडवून आणले पाहिजे या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन संतोष मुंगूले यांनी केले तर आभार प्रा. विवेक पाल यांनी मानले. सदर कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.