लोकदर्शन मुंबई 👉राहुल खरात
मुंबई: आर्यारवी एंटरटेनमेंटच्या दुसऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सुरेंद्र गावसकर हॉल, नायगांव, दादर (पूर्व) येथे शनिवार, दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. सिने-नाट्य क्षेत्रांतील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी *सत्यशोधक ढोक यांना दै. आपलं नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत ,सिनेअभिनेत्री सिद्धी कामथ व संयोजक लेखक, दिग्दर्शक, निर्माता व अभिनेता महेश्वर तेटांबे यांचे शुभहस्ते महाराष्ट्र , हरियाना ,राजस्थान व तेलगाना राज्यात जावून सामाजिक कार्य तसेच सत्यशोधक विवाह चळवळ मोठ्या प्रमाणात गेली 32 वर्षे अखंड चालू ठेवली त्या बद्दल समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध ज्येष्ठ कवी प्रा. विसुभाऊ बापट, , अरुण म्हात्रे, प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर प्रसिद्ध अभिनेत्री डॉ. गीता कुडाळकर, अभिनेता अनंत सुतार, निर्माता सुरेश डाळे,जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,,अँड. सुनिल शिर्के, डाँ. किशोर खुशाले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जीवनगौरव पुरस्कार ……
यांना तर सामाजिक कार्याबद्दल भारती विध्यापीठ नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य जोगदेव ,जेष्ठ पत्रकार राहुल खरात , एक पात्री कलाकार शुभांगी शिंदे फलटणकर यांना कलाक्षेत्र तर निर्भीड पत्रकारिता व समाजसेवेबद्दल अखंड न्यूज चँनेल,पंढरपूर चे सुरेखा भालेराव ,सोलापुर बार्टीच्या प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे आदी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या लघुपट सोहळ्यासाठी व ग्राफीक डिझायनर, समाजसेवक मनिष व्हटकर, अभिनेत्री लक्ष्मी गुप्ता आणि सोनाली पेडणेकर यांनी विशेष मेहनत घेतली तर सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक विलास (बाळा) चोकेकर यांनी केले आणि कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक संयोजक महेश्वर तेटांबे व आभार …… यांनी मानले.