,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर: 👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेत (NMMS) पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने नुकतीच जाहीर करण्यात आली असून सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथील चार विद्यार्थी कु. खुशी अजय कलेगुरवार,कु. अंकिता तुळशीदास गेडाम, कु. फाल्गुनी राजू नागोसे, कु. लायबा परवीन इजाज रफिक शेख शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या शाळेतून एकूण 23 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून चार विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे, संस्थेचे अध्यक्ष डॉ.आनंदराव अडवाले,सचिव श्री नामदेवराव बोबडे तसेच सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक श्री धर्मराज काळे, पर्यवेक्षक श्री महेंद्रकुमार ताकसांडे, मार्गदर्शक शिक्षक श्री एस यु पाटील,कु. एम डी उमरे,श्रीकांत सर,वर्गशिक्षक श्री बी एम मरसकोल्हे तसेच इतर शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.