By : प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :
होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूलच्या विज्ञान विभागातर्फे साएंशिया 2024-25 या मंचाचे आयोजन करण्यात आले होते आणि विज्ञान आणि कला प्रदर्शनी चे आयोजन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर दीपा यांच्या अध्यक्षतेखाली जनता महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख व प्राध्यापक डॉ. प्रवीण जोगी, एबीपीएस आवारपूर विज्ञान विभागाचे प्रमुख श्री. देविदास मोहुर्ले, चांदा स्कूल चे कुलपती व डायोसेस रेव्ह. डॉ. शिबू मोनिपल्ली आणि शाळेच्या व्यवस्थापक सिस्टर लिस्सी जोस मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. या फोरमचा दृष्टीकोन म्हणजे आजूबाजूच्या संशोधनाचा शोध जो मुलांना व्यक्त होण्यास सक्षम बनवतो. या मंचाच्या बॅनरखाली 2024-25 या शैक्षणिक वर्षात विविध विज्ञान आधारित उपक्रम, स्पर्धा, कार्यशाळा, चर्चासत्र आणि फील्ड ट्रिप आयोजित करण्यात येणार आहेत. डॉ. नाझिया अली परवेझ, प्रभारी सायंटिया 2024-25 यांनी मंच स्थापन करण्यामागील दृष्टीकोन सामायिक केला आहे. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक वृत्ती रुजवण्यासाठी प्रोत्साहन दिले. विज्ञान प्रदर्शनीत 100 हून अधिक प्रदर्शने ठेवण्यात आली होती. होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्पीड पेंटिंग करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. मुख्याध्यापिका सिस्टर दीपा यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि साएंशिया 2024-25 साठी शुभेच्छा दिल्या. शेवटी शाळेच्या विज्ञान विभाग प्रमुख आरती सातपुते सचिव सायंटिया 2024-25 यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.