लोकदर्शन.बदलापूर 👉-गुरुनाथ तिरपणकर
गुढीपाडवा म्हणजे नव वर्ष प्रारंभ,नविन वर्षाची सुरूवात,आणि स्वागत यात्रा,त्याच अनुषंगाने गुढी पाडव्यादिवशी श्री हनुमान मारुती देवस्थान व नववर्ष स्वागत यात्रा समिती आयोजित गुढी पाडवा नव वर्ष स्वागत यात्रेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाने नव वर्ष स्वागत यात्रेत सहभाग घेतला.मंडळाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील पालखी नृत्याचा देखावा सादर करण्यात आला.रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवाशी मंडळाच्या या नव वर्ष स्वागत यात्रेत मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी अध्यक्ष अरविंद सावंत,सचिव मंगेश कदम,सह सचिव विजय परब,उपाध्यक्ष आबा बांदेकर,माजी सचिव रमेश मर्गज,खजिनदार सुवर्णा कदम,सदस्य सुनिल सदडेकर,अनिल सदडेकर,गुरुनाथ तिरपणकर,अंकीता सदडेकर,अंकीता विश्वासराव तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गवासिय सहभागी झाले होते.सर्व मंडळाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पालखी नाचविण्याचा मनमुराद आनंद घेतला.शेवटी एकमेकांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत गांधीचौक येथे स्वागत यात्रेची सांगता झाली.