सिंदखेडराजा येथे लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

  1. ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
    लोकदर्शन देऊळगाव राजा👉प्रा.अशोक. डोईफोडे
    ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
    मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून दिनांक 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील सर्व नोडल अधिकारी तसेच सर्व सहाय्यक यांची आढावा बैठक आज दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी निवडणूक हॉल तहसील कार्यालय येथे मा. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री.संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

आजच्या बैठकीमध्ये मा. खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या सर्व बाबींचा आढावा बैठकीमध्ये घेतला. प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडून, लोकसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी जमलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच लोकसभा निवडणूक 2024 ही यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडावी असे प्रा. खडसे यांनी सर्वांना आवाहन केले.

निवडणूकिसाठी लागणारे साहित्य तसेच पोलिंग बूथ वर लागणारे साहित्य या सर्वांचा आढावा घेऊन कोणतेही साहित्य कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित सेल ला करण्यात आल्या.

मा. खडसे यांनी आचारसंहितेचे पालन करताना कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, सर्व निवडणुकीतील कर्मचारी / अधिकाऱ्यांकडून कोणतीही चूक होऊ नये याची दक्षता घेण्याचे सुद्धा सर्वांना आवाहन केले तसेच आचारसंहितेचे पालन करून योग्य प्रकारे आपापली कामे कशी करावी यासाठी मार्गदर्शन केले.

लोकसभा निवडणुकीला प्राधान्य देऊन सर्व प्रक्रिया यशस्वी रित्या पार पाडण्याचे आवाहन केले…

आजच्या बैठकीला मा.तहसीलदार सिंदखेड राजा श्री. सचिन जयस्वाल, मा. गटविकास अधिकारी सिंदखेडराजा श्री. डॉ.श्रीकृष्ण वेनीकर, मा. मुख्याधिकारी देऊळगाव राजा श्री.अरुण मोकळ,मा.नायब तहसीलदार श्री. मनोज सातव ,मा.नायब तहसीलदार देऊळगावराजा अस्मा मुजावर, उप अभियंता श्री. काबरे इत्यादी अधिकारी तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते…
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *