ऑर्गनाझर शर्मिला केसरकर यांच्या म्युझिक मंत्रा प्रेझेन्टसचा”यादोंकी बारात”हा संगितमय कार्यक्रम कार्यसम्राट-प्रतिभावंतांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

 

लोकदर्शन ठाणे.👉प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर

-म्युझिक मंत्राचे बरेचसे शो मुंबई,ठाणे,नवी मुंबई या ठीकाणी संपन्न झाले आहेत.नवनवीन गायक,म्युझिशीयन,तंत्रज्ञ अशांना’म्युझिक मंत्रा’हे व्यासपीठ ऑर्गनाझर शर्मिला केसरकर यांनी उपलब्ध करून दिले आहे.त्याच अनुषंगाने नुकताच एम्.के.एज्.प्रस्तुत,म्युझिक मंत्रा प्रेझेन्टस्”यादोंकी बारात”हा ऑर्केस्ट्रा लोढा अमर,ऑडोटोरीयम,कोलशेत रोड,ठाणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.याप्रसंगी जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,लाईफ स्कील बिझनेस कोच-आदर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ.संतोष कामेरकर,वयम् पुस्तकाचे वितरक-आदर्श प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष राजेंद्र गोसावी,एक्सपर्ट ड्रायव्हींग टेक्नीकल स्कुलच्या संचालिका वैशाली बुरडे,स्वामी फाऊंडेशनचे बाळा म्हसकर,म्युझिक रेकाॅर्डींग स्टुडिओच्या संचालिका हेमा गांधी,आदर्श प्रतिष्ठानच्या सचिव नेहा मठकर आदी मान्यवर कार्यसम्राट-प्रतिभावंत व्यक्तींच्या उपस्थितीत”यादोंकी बारात”हा ऑर्केस्ट्रा उत्साहात संपन्न झाला.यावेळी ऑर्गनाझर शर्मिला केसरकर यांनी प्रमुख पाहुण्यांना पुष्पगुच्छ न देता अंध व्यक्तींनी तयार केलेल्या भेट वस्तु देऊन स्वागत केले व अंध व्यक्तींना आर्थिक मदत होईल या दृष्टिकोनातून आपली सामाजिक बांधिलकी जपली.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमात ठसकेबाज लावणी नृत्य ही सादर करण्यात आले.तसेच प्रतिथयश गायक-गायिका यांनी नवीजुनी हिंदी मराठी गाणी सादर करुन उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.म्युझिक मंत्राचे अँकर,को-आॅडीनेटर,साऊंड इंजिनिअर,गेस्ट सिंगर,म्युझिक एरेंजर,गायक-गायिका,सर्व म्युझिशीयन,सह कलाकार,बॅक स्टेज कलाकार यांच्या सर्वांच्या मेहनतीने”यादोंकी बारात”या संगितमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.हा शो संपन्न होण्यासाठी बीजेपी चित्रपट कामगार आघाडी डोंबिवली शहर उपाध्यक्ष अरविंद सुर्वे व शर्मिला केसरकर कुटुंबियांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here