पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची सभा

By : अजय गायकवाड

वाशिम / मालेगाव
लोकसभा निवडणूक आणि आगामी येवू घातलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,ईद, रामनवमी, इत्यादी धार्मिक सण या महिन्यात आसल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी सकाळी ११ वा. पाटील व शांतता समितीची सभा पार पडली.
यावेळी एकाच दिवशी चौवीस ठिकाणी मिरवणुका असल्याने पोलिस प्रशासन बंदोबस्तात व्यस्त आहे.म्हणून आपली जबाबदारी फार मोठी आहे.तसेच मिरवणुकीत मोठ्या आवाजाचा वृद्धांना व ईतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच धार्मिक मिरवणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करु नये.डी.जे.वाद्याला परवानगी दिली जाणार नाही.वेळेच्या आता मिरवणुक विसर्जित करा.असेही सांगितले आहे.
यावेळी कृ.उ.बा.स.माजी सभापती बबनराव चोपडे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, माजी सरपंच डॉ.विवेक माने,अक्षय पखाले,झिया अहमद खान सर, आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी २१ गावातील पोलीस पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, पत्रकार उपस्थित होते.पोलीस स्टेशने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे,व एस.एस.तायडे,पो.उ.नि.
दिलीप रहाटे आदी उपस्थित होते.संचलन व आभार प्रदर्शन व्ही.एन.मुसळे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here