प्रा. डॉ. संतोष देठे यांना राज्यस्तरीय पुरस्कार

By :  प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :

श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. संतोष देठे यांच्या “तुकोबांच्या अभंगातील बुद्धीप्रमाण्यवाद”या वैचारिक ग्रंथास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांच्याद्वारे रा. ग. जाधव राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक 31 मार्च 2024 रोजी विदर्भ हिंदी साहित्य सभागृह नागपूर येथे सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाल सबनीस, सुप्रसिद्ध नाटककार डॉ. सुनील रामटेके, तसेच सुप्रसिद्ध कादंबरीकार व साहित्यिक डॉ. विद्याधर बनसोड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डॉ. संतोष देठे यांचे “क्रांतीदर्शी तुकाराम”, “निश्चयाचा महामेरू: प्रभाकर राव मामुलकर”, “संत तुकाराम: अंधश्रद्धा, विचार व चिंतन”हे पुस्तके प्रकाशित असून “दलित साहित्य: एक समीक्षा”, तसेच”अश्रूंची फुले” (आत्मकथन) हे दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांच्या “क्रांतीदर्शी तुकाराम”या पुस्तकाला सुद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांचे नियतकालिकातून लेख व अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहे. तसेच महाविद्यालयात दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या “यशश्री”या वार्षिक अंकाचे प्रमुख संपादक आहेत.

त्यांच्या पुस्तकाला राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, श्री. कुंदोजवार साहेब, उपाध्यक्ष श्रीधरराव गोडे साहेब, सचिव अविनाश जाधव साहेब, सहसचिव दौलतराव घोंगडे, कार्याध्यक्ष एडवोकेट संजीव भाऊ धोटे, ज्येष्ठ संचालक श्री वेगिनवार साहेब, कोषाध्यक्ष बियाबानी साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. एम.वरकड, उपप्राचार्य डॉ. आर आर खेरानी तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *