वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड
मालेगाव :
शहरातील घाण व घरातील केरकचरा गावाबाहेर नेवून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पंचायतचे घंटा गाड्यांची व्यवस्था केली आहे. खासगी व्यक्तीला या कामाचे कंत्राट देण्यात येते. या वर्षी हे अकोला येथील एका व्यक्तीला देण्यात आले आहे. परंतु सदर व्यक्तीकडून हे काम योग्य प्रकारे केल्या जात नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरात मृत प्राणी हटविणे त्यांची जबाबदारी असताना हलगर्जीपणा केला जात आहे. तेव्हा संबंधित व्यक्तीकडून हे काम काढून घेण्याची मागणी गाडगे बाबा नगर मधील नागरिकांतून केली जात आहे.
शहरात अनेक वेळा रस्त्यावर डुक्कर, कुत्रे व मांजर या सारखे प्राणी अपघातात किंवा विषाची बाधा होउन मरतात.हे मृत प्राणी उचलून नेण्याची जबाबदारी घंटा गाड्यांच्या ठेकेदारांची आहे.यावर्षी हा ठेका अकोला येथील काळे नामक व्यक्तीला देण्यात आला आहे, असे नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांकडून समजले आहे.
या ठेकेदारांना फोन लावल्यास तो फोन उचलत नाही.त्यांचा फोन नेहमीच स्विच ऑफ असतो, असे एका कर्मचाऱ्यांनीच सांगितले आहे.नगर पंचायतला सांगितले असता ते म्हणतात ठेकेदारांना सांगा.या टोलवा टोलवीत मृत प्राण्यांचा वास सुटतो.त्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होतो.शेवटी नाविलाजाने घरा जवळच्या लोकांनाच हे प्राणी उचलून दूर न्यावे लागते.ता ३१ रविवारी गाडगे बाबा नगर मधील रस्त्यावर एका वाहनांच्या धक्यात डुक्कर मरून पडले होते.नगर पंचायतच्या कर्मचाऱ्यांना यांची माहिती देण्यात आली होती.परंतु त्यांचाही फोन संबंधित ठेकेदारने उचलला नाही.या अगोदर हा ठेका मालेगाव येथील व्यक्तीकडे होता.त्यांना फोन लावल्या बरोबर तात्काळ माणूस येऊन त्याची विल्हेवाट लावत होता.तेव्हा संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी.तसेच घंटा गाड्यांवर संबंधित ठेकेदाराचा संपर्क क्रमांक टाकावा अशी मागणी तथा सुचना गाडगे बाबा नगर मधील नागरिकांनी केली आहे.