*शिवप्रतिष्ठान (रजि) चुनाभट्टी मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी…!*
लोकदर्शन मुंबई,चुनाभट्टी👉 -महेश्वर तेटांबे
चुनाभट्टी येथील शिवप्रतिष्ठान (रजि) ह्या सेवाभावी मंडळाने उत्साहवर्धक अशी शिवजयंती साजरी केली. यावेळी प्रत्येकाच्या मनामनांत आणि हृदयांत तरुणाई जोश जल्लोष आणि उत्साह दिसून येत होता. शिवजयंती निमित्त अनेक ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळत मिरवणुका काढण्यात आल्या.
अनेक ठिकाणी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आणि या सर्वांमध्ये विशेष आकर्षण ठरली ती म्हणजे चुनाभट्टी येथील शिवप्रतिष्ठान (रजि) मंडळ यांनी साजरी केलेली शिवजयंती. या मंडळातर्फे शिवजयंती निमित्त अतिशय दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुंदर अशी आरास करण्यात आली होती. राजगादीवर विराजमान श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. आजूबाजूचा परिसर विद्युत रोषणाईने डोळे दिपवित होता, तर विभागातील नागरिकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक शरद साळुंके व अध्यक्ष प्रकाश साळुंके आणि सर्व सभासदांनी शिवजयंती निमित्त तरुणांसाठी कॅरम स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांसाठी हळदीकुंकू व सर्वांसाठी भंडारा आणि लकी ड्रॉ चे सुद्धा आयोजन केले होते. यामध्ये विजेत्यांना भेटवस्तू आणि पैठणी प्रदान करण्यात आल्या. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये अतिशय शिस्तबद्धता दिसून येत होती. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय या उद्घोषाने संपूर्ण चुनाभट्टी परिसर दणाणून गेला. तसेच विभागातील नागरिकांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणुन . मुक्ताई नृत्याविष्कार डान्स अकॅडमी, चुनाभट्टी यांनी अतिशय सुंदर रीतीने सांस्कृतिक कार्यक्रम व मंगळागौर सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. आणि मंडळातर्फे ग्रुपला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नृत्यदिग्दर्शक विनोद मोहिते आणि श्रीधर पवार यांना पुढील वाटचालीसाठी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास संदीप माळी, भूषण साळुंखे, अक्षय गुडेकर, स्वप्निल बालगुडे, दर्शन सोनटक्के, राकेश पवार, साहिल रुबजी, देवेंद्र घागरुम, आकाश सोनटक्के, आत्माराम म्हात्रे, श्री प्रतीक पाटणकर, श्री सचिन मोरे तसेच संस्थापक श्री शरद साळुंखे यांचे विशेष सहकार्य लाभले तर अध्यक्ष श्री. प्रकाश साळुंखे यांनी शिवजयंती निमित्त काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न राहील असे म्हटले आहे.