वीज देयक वसुलीसाठी महावितरणची धडक मोहीम

 

By : अजय गायकवाड : वाशिम जिल्हा प्रतिनिधी

मालेगांव :  वारंवार आवाहन करूनही वीज बिल न भरणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई जानेवारी महिन्यापासुन‘महावितरण’ने सुरू केली आहे.  घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांकडे थकीत रक्कम न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. मालेगाव शहरातील सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे १ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यात ७५ लाख रुपये वसुली झाली व अजुन ग्राहकांकडे ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे. दिलेल्या मुदतीत वीज बिलांचा भरणा न केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत असल्याने या थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे मालेगाव शहरातील ५५ लाख रुपयांची थकबाकी आहे त्यांनाही वीज बिल भरण्याची विनंती ‘महावितरण’कडून करण्यात येत आहे त्याशिवाय सार्वजनिक पाणीपुरवठा वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे थकबाकी आहे ‘महावितरण’च्या संबंधित कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके या मोहिमेत सहभागी झाली आहेत त्याशिवाय तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *