भेंडखळ येथे कमळ चषक २०२४ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न.

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

उरण दि २४ मार्च कबड्डी खेळ खेळणाऱ्या व कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळावे,कबड्डी खेळाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा, खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी भेंडखळ तर्फे तसेच सरपंच मंजिता पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने ठाणकेश्वर मैदान,भेंडखळ तालुका उरण येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा कमळ चषक २०२४ चे आयोजन करण्यात आले होते.

सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी नारळ वाढवून केले.यावेळी आमदार महेश बालदी,जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,भाजपा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर,नगरसेवक कौशिक शहा, कामगार नेते जितेंद्र घरत,कामगार नेते सुधीर घरत,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी जे पाटील, भेंडखळ ग्रामपंचायतचे सरपंच मंजिता मिलिंद पाटील, उपसरपंच अक्षता ठाकूर, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी किरण केणी आदी मान्यवर उपस्थित होते.

या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या व्यासपीठावर प्रसिद्ध खेळाडू तथा प्रशिक्षक प्रशांत पाटील, मैदान व्यवस्थापक पंकज भोईर,हरेश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण ३२ प्रसिद्ध संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये टी. बी. एम करावे या संघाने प्रथम क्रमांक पटकविला. तर जय हनुमान वाशी या संघाने द्वितीय, नवकिरण भेंडखळ या संघाने तृतीय तर शिवशंभु या पटनेश्वरी या संघाने चतुर्थ क्रमांक पटकविला आहे.भारतीय जनता पार्टी भेंडखळ व सरपंच मंजिता पाटील, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पाटील यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व आयोजन केले होते.भेंडखळ भाजप अध्यक्ष संजय रामदास ठाकूर,संदीप पाटील,सिद्धार्थ ठाकूर, अमित ठाकूर, प्रितश घरत यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.स्पर्धकांनी, नागरिक ग्रामस्थांनी या रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेचे, आयोजकांचे कौतुक केले.कमळ चषक २०२४ रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा भेंडखळ येथे मोठया उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *