By : Devanand Sakharkar
चंद्रपूर/वरोरा : नावापुढे आमदार किंवा खासदार हे पद लावण्यासाठी निवडणूक लढवत नसून गोरगरिबांचे कल्याण, शेतकरीवर्गाचा विकास, राष्ट्रविकासासाठी लोकसभेची निवडणूक लढवत आहे, अशी गर्जना महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री व चंद्रपूर मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
वरोरा येथे गुरुवार, 21 मार्च रोजी विधानसभा पदाधिका-यांच्या बैठकीला ते संबोधित करत होते. मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला असून मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी सभांचे आयेाजन केले जात आहे.
कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम ‘मिशन मोड’वर करण्याचा सल्ला देताना मा. श्री. मुनगंटीवार म्हणाले, भाजपने केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून द्यावे. यावेळी देशाचे पंतप्रधान विश्वगौरव मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करून विजयश्री खेचून आणायची असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी जोर लावण्याची गरज आहे. जाहीर सभांना गर्दी खेचणे हेच आपले काम नसून प्रत्येक बूथ बळकट करण्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन करताना त्यांनी ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ असा नारा लावला.
मतदारयादी ही आपल्यासाठी राजकीय धार्मिक ग्रंथ असून तिला समजून घेत तिचे विश्लेषण करा असा मोलाचा सल्ला देताना त्यांनी हा ग्रंथ देशाची सफलता, विकासाचा मार्ग सुकर करेल, असे म्हणाले. कॉंग्रेसवर निशाणा साधताना मा. श्री. मुनगंटीवार म्हणाले, कॉँग्रेस पक्ष ‘सेटिंग-फिटिंग’चे राजकारण करीत असून समाजमाध्यमांवर भ्रामक प्रचार करण्याची शक्यता आहे. त्यांचा हा अपप्रचार मोडून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.