लोकदर्शन.👉 प्रा.गजानन राऊत
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत झालेल्या शिक्षक क्रीडा व कला महोत्सवाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा घेण्यात आले. या क्रीडा व कला महोत्सवात विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स जीवती महाविद्यालयातील कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांनी क्रीडा व सांस्कृतिक कला स्पर्धेत सहभाग नोंदविला. यात संपन्न झालेल्या लघुनाटिका या कला प्रकारात महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या संकल्पनेवर आधारित लघु नाटिका सादर करण्यात आली. काळानुसार बदल होणे गरजेचे आहे, हा संदेश समाजापर्यंत पोहचला पाहिजे या उदात्त हेतूने सदर लघु नाटिका सादर करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शाक्य मॅडम यांनी प्रोत्साहित करुन सहकार्य केले. या लघू नाटिकेत प्रमूख भूमिकेत प्रा. अमित बोरकर, प्रा. डॉ. वैशाली डोर्लीकर, डॉ. परवेज अली, प्रा.डॉ. योगेश खेडेकर डॉ. दिनेश दुर्योधन, प्रा. सचिन यनगंदलवार, प्रा. गणेश कदम यांनी सहभाग घेऊन आपल्या भूमिकाना उत्तमरीत्या न्याय देण्यात यशस्वी झालेत. व त्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. सदर यश हे महाविद्यालयीन प्राध्यापक वर्गात नवीन चैतन्य निर्माण करण्यास नक्कीच कारणीभूत ठरणार आहेत. असे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शाक्य यांनी त्यांचा सत्कार करताना वक्तव्य केले.