फ्रेंड्स ऑफ नेचरचा १८ वा वर्धापन दिन चिरनेर येथे उत्साहात साजरा.

 

लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि १४ मार्च फ्रेंड्स ऑफ नेचर ही उरण तालुक्यातील प्रसिद्ध अशी पर्यावरण प्रेमी, प्राणीप्रेमी संस्था आहे.१३ मार्च २००६ साली स्थापन झालेल्या या संस्थेने आतापर्यंत हजारो मुक्या पशु पक्षी प्राण्यांना जीवनदान दिले आहे. या संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविण्यात आले. उरण तालुक्यातील वन संपदा वाचविण्यात, पर्यावरणाचे रक्षण करण्यात या संस्थेचा महत्वाचा वाटा आहे. अशा या संस्थेचा १८ वा वर्धापन दिन चिरनेर मध्ये प्राणीमित्र पर्यावरण प्रेमी तथा फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांच्या निवास स्थानी मोठया उत्साहात संपन्न झाला.

निसर्गाचे, पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करणाऱ्या फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेला १३ मार्च २०२४ रोजी १८ वर्षे पूर्ण होऊन संस्थेने १९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.त्या अनुषंगाने पर्यावरण प्रेमी जयवंत ठाकूर यांच्या निवास स्थानी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )या संस्थेच्या नामफलकाचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी कचरा साफसफाई करणाऱ्या मजुरांना उंदीर, साप, विंचू आदी विषारी प्राण्यांचा धोका असल्याने साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पायात घालण्यासाठी सेफ्टी बूटचे वाटप करण्यात आले. अगदी साध्या पद्धतीने फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेने आपला १८ वा वर्धापन दिन कोणताही गाजावाजा न करता शांततेत साजरा केला.

यावेळी फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत ठाकूर,श्रद्धा जयवंत ठाकूर, उपाध्यक्ष राजेश पाटील, सचिव शेखर म्हात्रे, सदस्य – सचिन घरत,अनुज पाटील,हिम्मत केणी,निकेतन ठाकूर,चरण पाटील,प्रितम पाटील,मनोज रावल,राकेश शिंदे,निवृत्ती भोईर,विवेक हुडली,प्रथमेश मोकल,मिलिंद म्हात्रे,हृषिकेश म्हात्रे,तुषार कांबळे,राजेश अ.पाटील,स्वप्निल म्हात्रे,दिनेश चिरनेरकर,कु.प्रथमेश जयवंत ठाकूर,कु.सृष्टी जयवंत ठाकूर,विठ्ठल ममताबादे आदी संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

 

संस्थेचा थोडक्यात परिचय :-

१३ मार्च २००६ रोजी फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन):- सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था चिरनेर,ता.उरण,जि. रायगड-महाराष्ट्र
नोंदणी क्र.एफ-5358 (रायगड).
या संस्थेची स्थापना झाली.जनसामान्यांच्या मनातील सापाची भीती व गैरसमज दूर करून निसर्गसंवर्धन कार्यात लोकसहभाग वाढविणे हा संस्थेचा मूळ उद्देश होता- आहे.याकरिता उरण, पेण, पनवेल तालुक्यात अनेक सर्पमित्र-निसर्गमित्रांना याबाबत चे प्रशिक्षण देऊन गावोगावी,शाळा कॉलेज अशा ठिकाणी निसर्ग विषयक अनेक प्रबोधनपर कार्यक्रम केले आहेत.मानवी वस्तीत आलेल्या वन्यजीवांची इजा न पोहीचविता वनखात्याच्या परवानगीने सुटका करून वनक्षेत्रात मुक्त करणं हे संस्थेचे प्रथम कर्तव्य ठरले आहे.
रस्ते अपघातात अनेक जखमी वन्यजीवांना फॉनच्या अनाथालयात आश्रय देऊन प्रथमोपचार देऊन नंतर त्यांच्या अधिवासात मुक्त केले आहेत.गंभीर दुखापत असेल तर वनखात्याच्या सहकार्याने त्या वन्यजीवाला पुढील उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.
S.A.T._Snakebite Action Team …म्हणजेच सॅट स्नेकबाईट एक्शन टीम (सर्पदंश कृती दल) हे संस्थेचं दुसरं अंग २००६ ते २०२४ या कालावधीत १ विंचुदंश रुग्ण व ४१ सर्पदंश रुग्णांना वाचविण्यात संस्थेला यश आले आहे. वणवे रोखणे,त्याबद्दल जनजागरण करणे, वन्यजीवांची तहान भागविण्याकरिता जंगलातील मृत झरे पुनर्जीवित करणे,तसेच सृष्टी वृक्ष बँक च्या माध्यमातून अनेक ठिकाणी वृक्षारोपण करणे.चिमणी दिनानिमित्त शाळा- कॉलेज व गावांमध्ये प्रबोधन तसेच वेस्ट मधून बेस्ट संकल्पनेतून चिमणी घरट्यांच मोफत वाटप असे विषय संस्था हाताळते. वनखात्यासोबत वन्यजीव रेस्क्यू ऑपरेशन मध्ये संस्था अग्रस्थानी असते.११ मे २०११ रोजी उरण करंजा गावात आलेल्या बिबट्याला जेरबंद करणे कामी संस्थेला यश आले पण या कामात संस्थेचे ३ सदस्य जबर जखमी झाले.यासाठी पालकमंत्री सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते संस्थेला सन्मानित करण्यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *