लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे आजूबाजूच्या गावाच्या आरोग्याकडे लक्ष देत आहे,मानोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केलेत.
या शिबिरात एकूण 105 वृद्ध महिला व पुरुष यांची तपासणी करून त्यांना औषपचार करण्यात आला तर एकूण 85 लोकांच्या डोळ्याचा नंबर काढून चष्मा बनविण्याकरिता पाठविण्यात आला.
पुढील 1 हफ्तायामध्ये मानोली येथील सर्व 85 लोकांना चष्मा बनवून वाटप करण्यात येणार आहेत.
तसेच मागील आठवड्यात बैलमपूर येथे तपासणी केलेल्या 70 नागरिकांना चष्मा वाटप करण्यात आला आहेत.
चष्मा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी माणिकगडचे मनापासून आभार व्यक्त केलेत.
या शिबिरात नेत्र चिकित्सक, चंद्रपूर येथील डॉ पराग टेंभूर्डे व त्याच्या पथकाची उपस्थिती होती. तसेच गांवतील सरपंच, उपसरपंच,मुख्याध्यापक श्री.जी.व्ही.पवार, विषय शिक्षक, राजेश पवार, साहाय्यक शिक्षक वनपाल सोयाम व शिक्षिका सिता मेश्राम, प्रतिभा रायपुरे मॅडम,अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस,आशा वर्कर व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्टीत नागरिक यांची उपस्थिती होती.
या शिबिराला यशस्वी करण्यास सी.एस. आर.टीम माणिकगड ने अथक प्रयत्न केलेत.