लोकदर्शन पनवेल प्रतिनिधी👉-प्रणाली निमजे
“आर्यारवी एंटरटेनमेंट” प्रस्तुत, महेश्वर तेटांबे निर्मित, प्रमोद दळवी लिखित, आणि महेश्वर भिकाजी तेटांबे दिग्दर्शित “आखिर सच उगल दिया” या हिंदी वेबसिरीजचं चित्रीकरण लवकरच पनवेल नगरीतील काळुंद्रे या गावांत संपन्न होणारआह़े. गुन्हेगारी विश्वावर आधारित आणि गुन्ह्यांचा अचूक वेध घेणाऱ्या ह्या वेबसीरिजमध्ये अनेक नामांकित कलावंतांचा सहभाग असणार आहे. त्यांत प्रामुख्याने रवी मोरे, लक्ष्मी गुप्ता, सुनिल पाटेकर, बाळाराम चिखलेकर, गीता कुडाळकर, सचिन परदेशी, सुजाता बत्तीन, विशाल म्हसकर, महेंद्र पाटील, निलेश घाडी आदी सर्व कलावंतांचा महत्वपूर्ण सहभाग असणार आह़े. पटकथा-संवाद महेश्वर तेटांबे यांचे असुन या वेबसिरीज साठी प्रणेश लोगडे यांची रंगभूषा लाभली असुन संकलनाची जमेची बाजू महेश मोरे हे सांभाळणार आहेत. या संपुर्ण वेबसिरीजच्या प्रॉडक्शन ची धुरा निलेश घाडी हे सांभाळणार असुन या वेबसिरीज साठी प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगांवकर, सचिन परदेशी, बाळाराम चिखलेकर आणि विशाल म्हसकर यांचे विशेष योगदान लाभणार आह़े