By : अजय गायकवाड
वाशिम / रिसोड : रिसोड येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत व इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन वाशिम. (इश्यु)संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच्या चित्राबाई अंभोरे,उपसरंच व सर्व सन्माननीय सदस्य, ग्रामविकास अधिकारी भुसारी, ग्राम बालसंरक्षण समितीचे सदस्य, तथा गावातील महिला व पुरुष व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या गावचे ग्रामविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की बालविवाह करू नये व होऊ देऊ नये ही आपल्या सर्वांचे जबाबदारी आहे व बालविवाह होत असल्यास कुठे निदर्शनास आल्यास २००६ च्या बालविवाह कायद्या अन्वये त्यांच्यावर कारवाई केली जाईल.बालविवाहातील मुले,मुली शारीरिक व मानसिक तंदुरुस्त नसतात.आर्थिक समस्या निर्माण होतात, याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. इंडियन सोशल सर्विस युनिट ऑफ एज्युकेशन वाशिमचे जिल्हा समन्वयक बाल कामगार विनोद अंभोरे यांनी बालविवाह रोखण्यासंदर्भात पोस्टर व बालविवाह प्रचार प्रसार करण्याबाबतच्या पिशव्या यांचे वाटप केले. सर्वांनी आपल्या गावात, आपल्या घराघरात भिंतीवर प्रसारासाठी लावणे व बालविवाह प्रतिबंध बाबत जनजागृती मध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा व सहकार्य करावे असे सांगितले शेवटी सामूहिक बालविवाह होऊ नये व करू नये अशी शपथ घेण्यात आली या कार्यक्रमाची सांगता शेवटी करण्यात आली.