By रविकुमार बंडीवार
अवैद्य व्यावसायिक कोरपना पोलिसाच्या रडारवर
•• अंतरगाव येथे सुगंधीत तंबाखू विक्रेत्यावर कारवाई ; दोन लाख अठरा हजार सातशे मुद्देमाल जप्त
नांदा फाटा : अवधरित्या सुगंधीत तंबाखू विक्री, जनावर वाहतूक, रेती तस्करी, दारू विक्री , सट्टापट्टी या विरोधात कोरपनाचे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात
कोरपना पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे अवध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
गेल्या महिन्याभरात विविध गुन्ह्याच्या वीस हून अधिक कारवाया करण्यात आल्या आहे. परिणामी अवध व्यवसायिकांना मोठा चाप बसला आहे. शनिवार दिनांक दोनला अशीच सुगंधीत तंबाखू विक्रेत्याविरुद्ध धडक कारवाई उगारण्यात आली. अंतरगाव बू येथे सिनेस्टाईल सुगंधीत तंबाखू विक्रेत्याचा पाठलाग करून स्विफ्ट डिझायर वाहनाच्या डीक्कीतून मजा चे २० नग डब्बे एकूण अठरा हजार सातशे रुपयाचा माल जप्त करण्यात आले. तसेच यासोबत स्विफ्ट डिझायर वाहन अंदाजे दोन लाख रुपये किंमतीचे वाहन ताब्यात घेण्यात आले.असा एकूण दोन लाख अठरा हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर अपराध क्रमांक ४२/२०२४ कलम ३२८ ,१८८,२७२,२७३,३४ भांदवी सकलम २६ (२) अ ३० (२) ,३,४,५९(अ ) अन्नसुरक्षा आणि मानवी २००६ सह कलम १३०/१७७ मो वा का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील दोन आरोपीला अटक करण्यात आली असून एकाचा कसून शोध सुरू आहे.अवध व्यवसायिकावर होणाऱ्या सातत्यपूर्ण कारवायामुळे कोरपना हद्दीतील अनेक अवध व्यवसाय कायमस्वरूपी बंद झाले आहे.