‘त्या’ 30 गुरांचा चारापाण्यावाचून गोशाळेत मृत्यू

लोकदर्शन

गडचिरोली :

#भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात  धानोरी या गावात असलेल्या बळीराम गौशाळेत 30 जनावरांचा चारा पाण्याविना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरी येथील बळीराम गौशाळेत दोन दिवसांपूर्वी पाठविलं होतं.

मात्र, बळीराम गौशाळेच्या संचालकांनी या जनावरांसाठी कुठल्याही प्रकारचा चारा किंवा पाण्याची व्यवस्था केली नाही. रात्रीला यातील 30 जनावरे मृत पावली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे.

Report: Motghare Harish
#maharashtra

सौजन्य : आकाशवाणी वृत्त विभाग, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here