लोकदर्शन 👉राहुल.खरात
मिरज येथील श्री रेणुका कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणारा आदर्श माता गौरव पुरस्कार 2024 हा परिवर्तनवादी चळवळीतील दांपत्य मारुती शिरतोडे यांच्या पत्नी सौ.रंजना मारुती शिरतोडे यांना जाहीर झाला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीला वंदन करण्यासाठी व महिलांच्या क्षमता पूर्ण कौशल्यांचा सन्मान व गौरव करण्यासाठी देण्यात येणारा आदर्श माता गौरव पुरस्कार हा प्रतिकूल परिस्थितीत उत्तम संसार सांभाळून आपल्या पाल्यांना उत्तम घडवल्याबद्दल दोन्ही संस्थांच्या वतीने वाझर ता. खानापूर येथील सौ रंजना मारुती शिरतोडे यांना आदर्श माता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कॉम्रेड मारुती शिरतोडे, सौ.रंजना शिरतोडे हे दाम्पत्य डाव्या पुरोगामी चळवळीतील एक सक्रिय दांपत्य म्हणून सर्वपरिचित आहे. सौ रंजना मारुती शिरतोडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपली तीनही मुले वैभव विशाल विक्रम यांना उच्च शिक्षण देऊन उत्तम घडवले आणि सामाजिक राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा दिली. विशाल व विक्रम हे चित्रपट नाटक क्षेत्रात आपले नाव कमावित असून वैभव शिक्षकी पेशाची पदवी घेऊन सध्या स्पर्धा परीक्षा देत आहे.या कुटुंबात एक आदर्श स्त्री म्हणून सौ.रंजना शिरतोडे यांनी उत्तम कामगिरी पार पाडल्याबद्दल आणि आपल्या मुलांना चांगले घडवल्याबद्दल आदर्श माता गौरव पुरस्कार 2024 ने त्यांना सन्मानित करण्यात येणार सन्मान चिन्ह प्रमाणपत्र शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार 10 मार्च रोजी माधवजी लॉन्स सांस्कृतिक भवन किल्ला भाग मिरज येथे हिज हायनेस पद्माराजे पटवर्धन मिरज सरकार व डॉ.प्रा.नंदा पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती वरील संस्थांचे पदाधिकारी परशुराम कुंडले, रामलिंग तोडकर, युवराज मगदूम, विनायक कुलकर्णी, कमल माळी व प्रसाद कुंडले यांनी दिली.