डॉ बाबासाहेब आंबेडकर बचत भवन दुरुस्ती, देखभाल,साठी एकोणीस लाख पंचवीस हजार रुपये मंजूर! *♦️आटपाडी अखेर सर्वांच्या लढ्याला यश,महामानव डॉ नेंद्र बाबासाहेब आंबेडकर बचत भवन देखभाल साठी एकोणीस लाख पंचवीस हजार रुपये मंजूर* ♦️सर्व पत्रकार, सर्व आंबेडकर प्रेमी जनतेचे आभार! ÷विलास खरात

 

लोकदर्शन 👉राहुल खरात

आटपाडी :दिनांक:-०5/०3/24

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम लेखा सहिता 1968 नियम 4 परिशिष्ट विभाग विभाग सभील अधिकारात्वये खाली नमूद केलेल्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात येत आहे.

जि.प.स्वीयनिधी-2023-24 च्या अंतिम अर्थसंकल्पात मंजूर होणेच्या अटीवर प्रशासकीय मंजुरी देणेत येत आहे.

. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सांगली.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली,

उप कार्यकारी अभियंता जि.प. सांगली

आटपाडी मध्ये आज डॉ आंबेडकर बचत भवन देखभाल साठी बेमुदत आंदोलन, आंबेडकर प्रेमी जनतेने केले होते!
त्या मागणीला यश आले असून एकोणीस लाख पंचवीस हजार रुपये ची मंजुरी मिळाली आहे तसे पत्र मा, मुक्तेश्वर माडगूळकर यांनी आंदोलन कर्ते यांनादिले आहे!

कार्यालयामार्फत मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि प सांगली यांना सदरचे बचत भवन दुरुस्त करणेबाबत पत्रव्यवहार करणेत आलेला आहे. मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विषयाचे गांभिर्य पाहून तात्काळ सदर दुरुस्तीसाठी प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे तरी सदरचे बचतभवनाचे दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रीया राबवुन तात्काळ दूरुस्ती करुन घेणेत येईल तरी आपणास विनंती आहे की आपण जे आंदोलन व रास्ता रोको करणार आहात तो करणेत येवु नये व प्रशासनास सहकार्य करावे.

(मुक्तेश्वर माडगूळकर) गट विकास अधिकारी गट-अ पंचायत समिती आटपाडी

प्रत माहीतीसाठी.-

१) मा. तहसिलदार आटपाडी.

या वेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख,, विलास खरात, यशवंत मोटे,लक्ष्मण मोटे,प्रभाकर खरात, रमेश पेंटर, सुरेश देशपांडे,मोहन खरात, आपा खरात, नंदकुमार खरात, शरद मोटे, कुमार मोटे, जगनाथ खरात, दादासाहेब कदम, डी एम पाटील सर, कॉम्रेड अरुण माने, अमित, , नवनाथ, हतिकर, सुरेश वाघमारे, अशोक लांडगे भिकाजीं खरात , रवींद्र लांडगे, आनंदा ऐवळे, दादा मरगळे,बळी रणदिवे
दिलीप बोराडे, दैनिक जन्मत पाटील, आंबेडकर करी जनता, पत्रकार बांधव उपस्थित होते

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *