By रविकुमार बंडीवार नांदा फाटा
नांदा फाटा:
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपल करिअर घडवाव या साठी प्रत्येक गावात वाचनालय असणे महत्वाचे आहे वाचनालयात वेळोवेळी बदलत्या अभ्यासक्रमानुसार पुस्तकांची गरज विद्यार्थांना जाणवत असते ही बाब विचारात घेऊन नांदा ग्रामपंचायत नी केलेल्या मागणी नुसार नांदा येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय ग्रामपंचायत नांदा ला आज अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, आवारपुर , व्दारे आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्ह अँड रुरल डेव्हल्पमेंट अंतर्गत स्पर्धा परीक्षा तयारी 48 पुस्तके वितरित करण्यात आली .
ग्रामीण भागातील गोर गरीब मुले वाचनालयात स्पर्धा परीक्षा तयारी करतात त्यांच्या अभ्यासात पुस्तकांची उणीव भासू नये व त्यांना यशाचं शिखर गाठून त्यांनी नांदा गावाच सुध्दा नाव लौकिक करावं असे प्रतिपादन नांदा ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप यांनी केले.
प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे वेळोवेळी वाचनालय करीता लागणारी मदत आम्ही आमच्या परीने करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे प्रतिपादन प्रतीक वानखेडे (सी.एस.आर. प्रमुख) यांनी केले .
स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष मेघाताई नरेश पेंदोर, सरपंच ग्राम पंचायत नांदा, पुरुषोत्तम आस्वले, उपसरपंच ग्राम पंचायत नांदा, श्रीहरी केंद्रे, ग्राम विकास अधिकारी, नांदा प्रतीक वानखेडे, (सी.एस.आर) प्रमुख, रत्नाकर चटप , मंगला गायकवाड सदस्य ग्राम पंचायत नांदा, देविदास मांदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तर स्वामी विवेकानंद वाचनालय येथील स्पर्धा परीक्षा तयारी करणारे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नितेश मालेकर यांनी तर आभार अनिल पेंदोर यांनी मानले.