by : Ravikumar Bandiwar
नांदाफाटा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खनिज विकास निधी शिल्लक आहे. या निधीमधून प्रशासन व पुढारी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचा कालायापालट करू शकतात. निधीच्या वाटपात काही मोजक्याच ग्रामपंचायतींना अधिक निधी देऊन इतर ग्रामपंचायतीवर अन्याय झालेला आहे. इतरही ग्रामपंचायतींना विविध कामांसाठी तत्काळ निधी निधी मंजूर करावा. अन्यथा सरपंच संघटना जिल्हाभर आंदोलन करेल, असा इशारा नंदकिशोर वाढई जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच संघटना चंद्रपूर यांनी दिला आहे.
चंद्रपूर जिल्हात अनेक मोठे उद्योग मोठ्या खदानी व कंपन्या आहेत .जिल्ह्याचा जवळपास 700 कोटी रुपये खनिज विकास निधी आत्तापर्यंत अखर्चित असल्याचे समजते .सदर निधीबाबत दोन महिने आधी जिहानियोजन भवन येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री सर्व आमदार जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत अनेक अधिकारी या उपस्थित होते ग्रामपंचायतीने विविध कामांसाठी केलेल्या मागणीचा विचार केला जाईल अशी ही सांगण्यात आले. प्रत्येक आमदारांना त्या त्या क्षेत्रातील विकास कामांसाठी 15 कोटी रुपयाचा निधी देण्याचा निर्णय झाला .मात्र खनिज विकास निधी अंतर्गत कामाची मंजूर यादी बघता काही मर्जीतल्याच ग्रामपंचायतींना सदर निधी देण्यात आल्याचे चित्र सध्या दिसल्याने अनेक ग्रामपंचायतचा हिरमोड झालेला झाला आहे ज्या ग्रामपंचायती कंपनी क्षेत्रात तसेच खदानी क्षेत्रात येतात त्याचबरोबर कोटी रुपयाचे गौण खनिज याच ग्रामपंचायतीच्या हद्दीतून विविध कंपन्यांसाठी वापरले जातात . अशा ग्रामपंचायतीना जाणीवपूर्वक प्रशासनाकडून निधी वाटपात डावलण्यात आल्याचा आरोप सरपंच संघटना करीत आहे . गौण खनिजाच्या अतिरिक्त उत्खननामुळे सदर गाव क्षेत्रातील जंगल पाणी शेती आधी बाबींवर विपरीत परिणाम होत आहे. त्याचबरोबर जड वाहनांमुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. गावांना प्रदूषण सहन करावे लागत आहे अशा परिस्थितीत गावात विविध समस्या असताना त्या समस्या कुठून सोडवायच्या असाही प्रश्न ग्रामपंचायतीपुढे असताना दुसरीकडे प्रशासन व राजकीय नेतेही सदर गावांकडे दुर्लक्ष करीत असताना दिसत आहे गावांमध्ये आजही शिक्षण आरोग्य पाणी मूलभूत सुविधा पूर्ण झालेल्या नसल्याचे चित्र आहे अशातच गावातील ग्रामपंचायतीकडून नागरिकांना विकास कामांची अपेक्षा असते परंतु वारंवार प्रशासनाकडे मागणी करूनही ती मागणी पूर्ण होत नसल्याने सरपंच तीव्र संताप व्यक्त करीत आहे जिल्ह्याचा एवढा मोठा खनिज विकास निधी शिल्लक असताना काही ग्रामपंचायतीला तुपाशी आणि काय ग्रामपंचायतीला उपाशी असा तुजाभाव केवळ राजकीय भावनेतून केला जात आहे अशी चर्चा सरपंच मध्ये दिसून येत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खनिज विकास निधी शिल्लक आहे सदर निधी मधून प्रशासन व पुढारी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीचा कालायापालट करू शकतात मात्र सदर निधीच्या वाटपात काही मोजक्याच ग्रामपंचायतींना मोठा निधी देऊन इतर ग्रामपंचायती वरती अन्याय झालेला आहे तात्काळ इतरही ग्रामपंचायतींना विविध कामांसाठी निधी निधी मंजूर करावा अन्यथा सरपंच संघटना जिल्हाभर आंदोलन करेल नंदकिशोर वाढई जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच संघटना चंद्रपूर.