By : Tukaram Dhandre
कोरपना :
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आसन खुर्द येथे निपुणोत्सव उपक्रमांतर्गत माझी पोषण थाळी हा उपक्रम पार पडला. उपक्रमाबद्दल शाळेचे शिक्षक तुकाराम धंदरे यांनी माहिती सांगितली. त्याचप्रमाणे सौ. मंगला बावणे अंगणवाडी शिक्षिका यांनी पोषणाचे महत्त्व पटवून दिले. सदर उपक्रमात एकूण 18 महिलांनी सहभाग नोंदवत आपल्या पोषण थाळी प्रदर्शनात मांडल्या. परीक्षकामार्फत 2 चमूने परीक्षण करून उत्कृष्ट पोषण थाळीचा प्रथम क्रमांक प्रणाली पायघन, व्दितीय क्रमांक लक्ष्मी गुरम तर तृतीय क्रमांक निता वडस्कर यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मुरकुटे,उपाध्यक्ष वनिता पायघन, तंटा मुक्त समितीचे उपाध्यक्ष सुरेश पेंदोर, गावपाटील महादेव पेंदोर , अशोक धाबेकर,पेसा सदस्य सुवर्णा कुमरे, सदस्य प्रियंका पेटकर, सुनिता आडे प्रामुख्याने उपस्थित होते. गावातील महिला,पालक,विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले.
मुख्याध्यापक घनश्याम पाचभाई, शिक्षक मारोती सोयाम यांनी उत्तम नियोजन करून माझी पोषण थाळी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.