By : Shankar Tadas
कोरपना : गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे उपमुख्याध्यापक अनिल काकडे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, पर्यवेक्षक तुराणकर, एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा. आरजु आगलावे, जयंती प्रमुख प्रा. नंदा भोयर उपस्थित होत्या. यावेळी प्रा. प्रदीप परसूटकर व प्रा. आशिष देरकर यांनी महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन वामन टेकाम यांनी केले तर आभार प्रा. नितीन वाढई यांनी मानले.