कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा थाटात. रविकुमार लक्ष्मण बंडीवार प्रतिनिधी
भद्रावती, चंद्रपूर: श्री स्वराज्य वीर संघटना, भद्रावती, चंद्रपूर यांच्या वतीने ८ व्या वर्षी कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ भव्यदिव्य आयोजित करण्यात आला.
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेशदादा वारलुजी बेले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यांनी शिवजयंती निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि शिक्षणाच्या खाजगीकरणाला विरोध दर्शविला.
दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी रविवार सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत नीलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, मुख्य मार्ग, भद्रावती येथे भद्रावती शहर स्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सोमवार सकाळी ८ वाजता नगर परिषद जवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भव्य मानवंदना आयोजित करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजता नगर परिषद भद्रावती ते नागमंदिर ते मा. बाळासाहेब प्रवेशद्वार पर्यंत विशाल शोभायात्रा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाला निखिल बावणे, स्वप्नील मोहितकर, युगल ठेंगे, अभि उमरे, निखिल उगे, रितेश वाडई, सुमित हस्तक, निलेश बुटले, सोनल टोपटे, बंटी रायपुरे, प्रवीण गिरोले, मनीष बुचचे, यश लेडागे, शिवम पारखी, शुभम शेलार, आकाश ठेंगे, साहिल बोनागिरी, मंथन राजूरकर आणि साहिल वालदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री स्वराज्य वीर संघटना, भद्रावती यांच्या वतीने आयोजित कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.