By : Shankar Tadas
कोरपना : रासेयो शिबिर हे विद्यार्थ्यांचा जीवनाला कलाटणी देणारे असून विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार निर्माण करणारे असतात. रासेयो शिबिरातून विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशा मिळते. असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी केले.
जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी अंतर्गत येत असलेल्या आसन बूज. येथे गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल थीपे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष विकास भोजेकर, सचिव धनंजय गोरे, संचालक रामचंद्र सोनपितरे, प्राचार्य शैलेंद्र देव, उपसरपंच आशिष देरकर, ग्रा. पं. सदस्य लक्ष्मण चिकराम, मुख्याध्यापिका नंदा येसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन रासेयो अधिकारी डॉ. संदीप घोडीले यांनी केले तर आभार मनोहर बांदरे यांनी मानले.