By : Shankar Tadas
कोरपना :. ०४ फेब्रुवारी ते दि. ११ फेब्रुवारी दरम्यान ‘गाव चलो अभियान’ यशस्वीपणे राबविण्यासाठी आज कोरपना तालुका मंडळाची नियोजनात्मक बैठक स्थानिक श्रीकृष्ण सभागृहात आयोजित करण्यात आली; या बैठकीला उपस्थित राहून अभियानात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावयाच्या विविध संगटनात्मक कामासंदर्भात मार्गदर्शन केले.
या अभियानादरम्यान भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते २४ तास बूथ स्तरावरील बैठकीपासून ते घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधतील. त्याद्वारे सरकारच्या योजनांची माहिती ते नागरिकांना देतील. त्यानुसार, प्रत्येकाची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. प्रत्येक बुथवर कार्यकर्ते भेट देवून ते बूथ स्तरावरील बैठका घेतील. यानंतर २४ तासांच्या मुक्कामात नागरिकांसोबत संवाद साधतील. अशा विविध विषयांवर याठिकाणी सविस्तर नियोजन पार पडले.
यावेळी माझ्यासमवेत तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर, गडचांदूर शहराध्यक्ष सतिश उपलेंचिवार, रमेश पा. मालेकर, पुरुषोत्तम भोंगळे, किशोर बावणे, निलेश ताजणे, अरूण मडावी, कार्तिक गोणलावार, शिवाजी सेलोकर, अमोल आसेकर, आशिष ताजणे, संजय मुसळे, शशिकांत आडकिणे, प्रमोद कोडापे, मनोज तुमराम, निखिल भोंगळे, विशाल अहिरकर, जगदीश पिंपळकर, धम्मकिर्ती कापसे, रवी बंडीवार यांचेसह आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
#GaonChaloAbhiyan