By : Shankar Tadas
गडचांदूर – सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ व्दारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय येथे दि. 2 फेब्रुवारीला माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. तर प्रमुख अतिथि म्हणून प्रा. रीमा पाठक सरदार पटेल कॉलेज चंद्रपूर, निशा खोब्रागडे पोलिस अधिकारी गडचांदूर, प्राचार्या वर्षा खोडके इंग्लिश मिडियम स्कूल गडचांदुर,शाळेचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रमुख अतिर्थिनी सावित्रीबाई फुले, माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केले.तसेच दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित माता ‘पालकांसाठी रांगोळी स्पर्धा, थाली सजावट, पुष्प सजावट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये, असंख्य साता पालकांनी सहभाग घेतात. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख अतिथीनी माता पालकांना विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, सायबर गुन्हे,मोबाईलचे दुष्परिणाम ई. बाबत सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून माता पालकांना विविध भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी मनिषा मोरे, सौ. गावंडे, कु. जोशी, कु. प्रा. यास्मिन बेग यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक कु. भुवनेश्वरी गोपमवार यांनी तर आभार माधुरी उमरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुषमा शेंडे, किन्नाके, जि. एन. बोबडे, सुरेश पाटील, मांढरे,वासेकर, आत्राम, मश्राम, कोगरे, शशीकांत चन्नै, लिलाधर मत्ते,प्रभाकर पुंजेकर, यांचे सह सर्व शिक्क संकल्प भसारकर यांचेसह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.