By : Shankar tadas
वर्धा :
पत्रकार लोकशाहीमधील खरा आरसा असून पत्रकारांनी निर्भीड व निरपेक्ष व पारदर्शकपणे लिखाण करावे .कुठल्याही राजकीय पक्षांचे मांडलिकत्व म्हणून काम करू नये. तरच पत्रकारांचे व्यक्तिमत्त्व लोकशाहीमध्ये येणाऱ्या काळात अबाधित राहील. असे मनोगत सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते जनमंच सदस्य नागपूर तथा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांनी केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी वर्धा जिल्ह्यातील बापू कुट्टी ला भेट देत चरख्यावर सूत कातीत अभिवादन करून शासकीय विश्रामगृह येथे आयोजित वर्धा जिल्हा पत्रकारांच्या विशेष संघटनात्मक बांधणीच्या नियोजित बैठकीत उपस्थित राहून ते बोलत होते.
सध्याच्या परिस्थितीत लोकहित- जनहित प्रश्नांना बगल देत काही स्तरावर राजकीय मंडळीचे घरगडी चाकरी करणाऱ्या पत्रकारांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने घातक प्रवृत्तीचे लक्षण आहे. पत्रकारांनी आपली अस्मिता अस्तित्व स्वाभिमान कुणाकडेही गहाण न ठेवता आपले व्यक्तिमत्व लोकशाहीमध्ये उजळ कसे राहील यादृष्टीने वाटचाल करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. शोषित पीडित यांच्या वेदना समस्या शासन स्तरावर पोहोचवण्यासाठी कोणत्याही राजकीय सामाजिक संघटना चळवळ यांचे मुखपत्र असणे आवश्यक आहे परंतु त्यात सामाजिक दायित्व हा भाग महत्त्वाचा आहे .असे मनोगत अध्यक्षीय बैठकी प्रसंगी केले. नियोजित बैठकीत कार्याविस्तार कार्यक्रम स्वरूप व रूपरेषा संघाचे सदस्यत्वतः जिल्ह्यातील विविध तालुका कार्यकारणी गठन या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले . प्रास्ताविक मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष प्रदीप नागपूरकर, संचालन जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर कोसुरकर यांनी केले. प्रसंगी सचिन महाजन, शेख मनवर शेख, महेंद्र लोखंडे, प्रमोद जुमडे, फैमोद्दीन शे. अनुदिन, आकाश जाधव, वा .शेंडे, समीर आसुटकर जिल्ह्यातील कार्यकारणीतील पत्रकार व सामाजिक पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. आभार सचिन महाजन यांनी केले.