भोयगावच्या शाळेस अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे सहकार्य
वाचनालयास दिली विविध पुस्तकांची भेट
नांदा फाटा :- रविकुमार बंडीवार
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयगाव येथे सुसज्ज वाचनालय तयार झाले आहे.मात्र विद्यार्थ्यांना वाचनाची सोय व्हावी करीता अंबुजा सिमेंट फाउंडेशन उप्परवाही यांच्याकडून नुकतेच विविध विषयांवरील २०१ पुस्तकांची भेट देण्यात आली.
विद्यार्थ्यांना वाचनाची सवय व्हावी,त्यातून उत्तम विद्यार्थी व आदर्श नागरिक निर्माण व्हावा करीता भोयगाव येथे वाचनालय सुरू करण्यात आले.मात्र विद्यार्थ्यांना हवी तशी मुबलक पुस्तके वाचनालयात उपलब्ध नव्हती अशा वेळी अंबुजा सिमेंट फाउंडेशन च्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महापुरुषांचे चारित्र्य ,विज्ञान, गणित,व्याकरण,इंग्रजी,सामाजिक शास्त्रे अशा विविध विषयांवरील आवश्यक २०१ पुस्तकांची भेट देण्यात आली.
सदर कार्यक्रमाला अंबुजा सिमेंट फाउंडेशन शिक्षण विभाग समन्वयक सरोज अंबागडे,शा.व्य. स.अध्यक्ष सुभाष पिंपळशेंडे ,उपाध्यक्ष सारीका मासीरकर,मनोहर वांढरे,सविता घटे,केंद्रप्रमुख विनय जांभूळकर,मुख्याध्यापक धनराज सोनवाने,शिक्षक गुणवंता खोरगडे,निलेश कुमरे,पवार,अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे अनिकेत दुर्गे,चैताली कन्नाके यांची उपस्थिती होती.