,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा.अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा या महाविद्यालयाला नॅकचा बी दर्जा प्राप्त झाला आहे. दि. 15 व 16 जानेवारी 2024 रोजी नॅक समितीने महाविद्यालयाला भेट दिली. नॅक समितीचे अध्यक्ष डॉ.झहुर अहमद चाट, समितीचे समन्वयक डॉ. सुबोध जैन, समितीचे सदस्य डॉ. सुकांता भट्टाचार्य यांनी महाविद्यालयाच्या विविध विभागांना भेटी दिल्या व परीक्षण केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. आशिष पईनकर यांच्या मार्गदर्शनात आयक्यूएसी समन्वयक डॉ. प्रशांत पुराणिक, नॅक समन्वयक डॉ. राजेश डोंगरे, सर्व विभाग प्रमुख आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून महाविद्यालयाला हा दर्जा प्राप्त झाला.
हे यश प्राप्त करण्याकरिता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुनिताताई लोढीया, सचिव डॉ. अनिल मुसळे व सर्व पदाधिकारी, पालक, माजी विद्यार्थी, त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे सर्व नियमित विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी नॅक मूल्यांकन प्रक्रियेमध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल प्राचार्य प्रा. आशिष पईनकर यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
,,