By : Gajanan Raut
जिवती :
भाषा ही मानवी मनावर सुसंस्कार करते : प्राचार्य डॉ. वाळके
विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवतीच्या मराठी विभागाद्वारे आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त अतिथी व्याख्यानात मुख्य मार्गदर्शक या स्थानावरून बोलताना डॉ.अनिता वाळके प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय मुल यांनी प्रतिपादन केले भाषेचे संवर्धन करायचे असेल तर आपल्याला आपल्याच घरातून सुरुवात करावी लागेल, तेव्हाच भाषेचा प्रचार व प्रसार होऊन वैभवशाली दिवस प्राप्त होतील. उपयोजित मराठीने अनेक व्यवसायिक संधी निर्माण करून दिले आहेत.मराठी भाषेत वेगळीच गोडी आहे.असे मत त्यांनी आपल्या विवेचनातून मांडले. तर भाषा समाज सुसंघटित करण्याचे उत्तम साधन व माध्यम आहे असे विचार डॉ. शैलेंद्र देव प्राचार्य महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदुर यांनी मुख्य अतिथी या स्थानावरून प्रतिपादन केले. तर मराठी भाषेचा वापर सर्वच क्षेत्रात अनिवार्य व्हावा असे विचार डॉ.दहेगावकर प्राचार्य आंबेडकर कॉलेज चंद्रपूर यांनी मांडले. मराठी भाषेस संपन्न व समृद्ध करण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरावर जनजागृती करणे आवश्यक आहे.असे विचार डॉ. शाक्य प्राचार्या विदर्भ महाविद्यालय जिवती यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना मांडले. सदर कार्यक्रमात मराठी भाषेचा उगम, विकास व महत्त्व यावर उपस्थित मान्यवरांनी विस्तीर्ण प्रकाश टाकून मराठी भाषेची महती विशद करून गुणगौरव करण्यात आला. तसेच भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे असे सर्व मान्यवरांनी आपल्या विवेचनातून विचार प्रकट केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राऊत यांनी तर आभार प्रा. डॉ. पानघाटे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.