नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

लोकदर्शन प्रतिनिधी

वरोरा :

उप जिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या महान व्यक्तींच्या जयंतीसाठी उप जिल्हा रुग्णालयाचे सर्वच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सर्व प्रथम डॉ. खुजे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. या कार्यक्रमाला वंदना विनोद बरडे सह. अधिसेविका, संगीता नकले, इंदिरा कोडापे, सरस्वती कापटे, गीतांजली ढोक, प्रियांका राय, गोविंद कुंभारे, ओमकार मडावी, तुमराम, निता गायकवाड, बंडू पेटकर हजर होते. याप्रसंगी मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here