*गडचांदूर येथे औषध विक्रेत्यांची कार्यशाळा*
नांदाफाटा : रविकुमार बंडीवार
महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल , चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व कोरपना , राजुरा , जिवती केमिस्ट असोसिएशन तर्फे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर तर्फे साकारण्यात आलेली एक दिवसीय फार्मसीस्ट रिफ्रेशर्स कोर्सची कार्यशाळा रविवार दिनांक २१ ला गडचांदूर येथील लक्ष्मी टॉकीज सभागृह येथे पार पडली.
ए आय ओ सी डी व एम एस सी डी ए चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे उपाध्यक्ष मुकुंद दुबे , महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल अध्यक्ष अतुल अहिरे यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा राज्यभर राबवण्यात येत आहे. या कार्यशाळेला महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशियन उपाध्यक्ष मुकुंद दुबे, महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद सदस्या सोनाली पडोळे , चंद्रपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल एकरे , उपाध्यक्ष रवी आसुटकर, सहसचिव अनुप वेगिनवार, अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या औषधी निरीक्षक नालंदा उरकुडे ,
कोरपना तालुका अध्यक्ष पराग जकाते , सचिव विनोद चटप , राजुरा तालुका अध्यक्ष हितेश डाखरे, सचिव धनजय बोबडे , जिवती तालुका अध्यक्ष मुजाहिद देशमुख ,सचिव मधुसूदन कदम आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाचे सेवानिवृत्त औषधी निरीक्षक पी एम बल्लाळ यांनी इंट्रोडॅक्शन ऑफ रेग्युलेटरी लॉ , किशोरी ताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी चे प्रा. दिनेश बियाणी यांनी रोल ऑफ फार्मसी , हायटेक फार्मसी कॉलेजचे प्रा. सतीश मोहितकर यांनी अँटिबायोटिक रेजिस्टन्स , अशोका इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य महेश हाडके यांनी ड्रग स्टोरेज , पीसीआयचे समन्वयक भूषण माळी यांनी मेडिकेशन एरर या विषयावर सविस्तर संबोधित केले.
या कार्यशाळेला कोरपना , राजुरा , जिवती तालुक्यातील मोठ्या संख्येने केमिस्ट बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिन पिंपळकर यांनी केले.