By : Satish Musle
नांदा :
अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडुन अनुलोम वस्ती मित्रांना श्रीराम मुर्ती वितरण सोहळा नुकताच नांदा व बिबी स्थानावर संपन्न झाला.अनुलोम ही सामाजिक संस्था असुन,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवित असते.केंद्र सरकार तथा राज्य सरकारच्या कल्याणकारी योजणांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी प्रयत्नरत् असते.विविध योजणांपासुन वंचित असणाऱ्या बांधवांसाठी विशेष सहकार्य संस्था करीत असते.
करोड़ों हिंदु बांधवांचे आराध्य प्रभु श्रीराम यांचे मंदिर लोकार्पण सोहळा अयोध्या येथे होतो आहे.त्या औचित्याने वस्ती व स्थान मित्रांना श्रीराम मुर्ती वितरण करण्याचे ठरविले आहेत.युवा उद्योजक निलेश ताजणे यांचे प्रमुख उपस्थितीत नांदा व बिबी स्थानावर मुर्ती वितरण सोहळा संपन्न झाला.वस्ती मित्र सुजित ठाकुर,स्थान मित्र नितेश बेरड,गोविंद गुप्ता गुरूजी यांना मुर्ती प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी युवा उद्योजक निलेश ताजणे हे होते.राजुरा भाग समन्वयक सतिश मुसळे,नितेश बेरड,गोविंद गुप्ता गुरूजी,सुजित ठाकुर, विशाल अहिरकर, सुरेंद्र मुसळे, ज्ञानेश्वर मोरे,हंसकर गुरूजी, रविकुमार बंडिवार उपस्थित होते.
प्रास्ताविकेत सतिश मुसळे यांनी संस्थेची सामाजिक कार्यरचणा विशद केली. कार्यक्रमास स्थानांवरील युवा,मातृशक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.