By : Habib Shekh
बिबी :
कोरपना तालुक्यातील हिरापूर येथे पौष्टिक तृणधान्य (मिलेट मिशन ) कार्यक्रम व मकर संक्राती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य पीक पद्धती व ज्वारी, बाजरी, राळा,नाचणी, राजगिरा आणि कोदु या तृणधान्य पिकाचे आहारातील महत्व,तृणधान्य पिकाचे क्षेत्र वाढवण्यासाठी पेरणी नियोजन करणे तसेच हरभरा पिकवरवरील घाटे आळी च्या एकात्मिक नियंत्रणासाठी पक्षी थांबे व फेरमन ट्रॅप लावावे आणि कृषि विभागच्या विविध योजना विषयी मार्गदर्शन गोविंद ठाकूर तालुका कृषि अधिकारी कोरपणा यांनी केले.तसेच डॉ संजीवनी चंदनखेडे ग्रामीण रुग्णालय गडचांदूर, फरजाना शेख आशा सुपरवाईझर प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा यांनी पौष्टिक तृणधान्य पिकाचे आहारातील महत्व व त्याचा आपल्या दररोज च्या आहरात त्याचा वापर केल्यामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.या विषयी मार्गदर्शन केले तर बिबी येथील प्रगतिशील शेतकरी हबीब शेख यांनी विविध पीक पद्धती याविषयी मार्गदर्शन केले.त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीता तुमराम सरपंच ग्रामपंचायत हिरापूर तर उपअध्यक्षा वंदनाताई बल्की कृषि उत्पन्न बाजार समिती कोरपणा उपसभापती तसेच अरुणभाऊ काळे उपसरपंच ग्रा. पं हिरापूर, माधवराव वाघमारे सेवानिवृत्त शिक्षक, कृषी मित्र मोहन पावडे,दत्तात्रय डाहुले,हरि उदगिर,मोहन तुमराम व ग्रा. पं सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशालीताई पावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दिक्षाताई वाघमारे यांनी मानले . तसेच या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची व उखाणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तर लहान बालकांसाठी अंताक्षरी स्पर्धा आयोजित करण्यात आली.या उखाणे स्पर्धेतील विजेत्या लता काळे यांना प्रथम बक्षीस , तेजस्विनी बोबडे यांना द्वितीय तर सावित्रीबाई वाघमारे यांना तृतीय बक्षीस वितरण कृषी सहायक रेणूका ताई कोकणे यांच्या तर्फे करण्यात आले.व संगीत खुर्ची स्पर्धा तील विजेत्या माधुरी कन्नाके प्रथम बक्षीस,छाया कोंडापे द्वितीय तर गीता जोगी तृतीय प्रोत्साहन पर बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यकमात स्त्री शक्ती महीला गृप,नारी शक्ती महीला गृप,स्वराज किसान गृप , महीला बचत गट व गावातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.