By : Shankar Tadas
चंद्रपूर :
आम आदमी पार्टी चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदी योगेश मुऱ्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. योगेश मुऱ्हेकर यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेत व जिल्ह्यातील त्यांचे संघटन कौशल्य, नेर्तृत्व क्षमता, कार्यकर्त्यावरील पकड, कामाचा सपाटा बघून शीर्ष नेतृत्वानी योगेश मुऱ्हेकर यांची थेट जिल्हा संघटन मंत्री पदी नियुक्ती केली. मागील दोन वर्षात योगेश मुऱ्हेकर यांनी पक्षवाढीकरिता खूप मेहनत घेतली असून शेकडो नवीन लोकांचा पक्षप्रवेश करून घेतला. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पार्टी मजबूत करण्यात व गावागावात आम आदमी पार्टी ची विचारधारा पोहचविण्यात त्यांना यश प्राप्त झाले आहे. योगेश मुऱ्हेकर हे सामाजिक कामातसुद्धा अग्रेसर असून युवाशक्ती ग्रामविकास संघटन महाराष्ट्र राज्य चे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष असून उत्तम समाजसेवक सुद्धा आहेत. ते पुरोगामी विचार धारेवर चालणारे असून स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत एक परिचित नाव आहे.
पार्टीने दिलेल्या नवीन जबाबदारी बद्दल त्यांनी सर्वप्रथम पार्टीतील सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले व श्री अरविंद केजरीवाल यांच्या विचारधारेवर पार्टीचे नाव व विचारधारा चंद्रपूर जिल्यातील समस्त गावागावात पोहचविण्याचे प्रण घेऊ डबल जोमाने काम करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सांगितले. पार्टीने