नांदा फाटा : रविकुमार बंडीवार
आवारपूर सिमेंट वर्कस् सातत्याने “कंत्राटदार प्रतिबद्धता” साठी सक्रिय असतात. कंपनी द्वारे कंत्राटदार व त्यांच्या कामगारांसाठी अनेक क्रीडा/सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जातात.
आवारपूर सिमेंट वर्कस् च्या व्यवस्थापनाने ऑक्टोबर महिन्यात “टग ऑफ वॉर- रस्सी खेच” प्रतियोगीतेचे प्रथम चरणांचे आयोजन केले होते ज्यामध्ये एकूण 26 संघांनी भाग घेतला होता आणि 14 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी व्यवस्थापनाने “टग ऑफ वॉर” ची अंतिम फेरी आयोजित केली होती. अंतिम फेरी मधे सर्व 14 संधांनी एक-मेकांना खूप कठीण टक्कर दिली. अंतिम सामन्यात सीक्युरीटी च्या फोर्स-1 चॅलेंजर विजेता ठरला आणि एन.एस.पी. टायगर्स या स्पर्धेचा उपविजेता ठरला. सुमारे 600 कार्यकर्ते आणि कुटुंबातील सदस्य संघाला साथ देण्यासाठी आणि चळवळीचा आनंद घेण्यासाठी कार्यक्रमात उपस्थित होते.
कार्यक्रमा च्या उद्घाटनाला युनिट हेड – श्री. श्रीराम पी. एस., श्री. नमित मिश्रा, श्री. संदीप देशमुख, श्री. सौदीप घोष, श्री. नारायण दत्ता तिवारी, श्री. सतीश मिश्रा श्री. सुमंत सिंह, चंदन सींग राठोर, श्रीप्रकाश सींग, शिवाजी भुसे व इतर कर्मचारी मैदानावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विजेत्या व उप-विजेत्या कामगारांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला.
युनिट हेड – श्री. श्रीराम पी. एस. म्हणाले की हा उपक्रम अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आवाळपूर व्यवस्थापन आणि कंत्राटी कामगार यांच्यातील सहजीवन संबंध निर्माण करण्यास मदत करेल.