जुनी पेन्शन योजना चालू करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे उपोषण

By : Rajendra Mardane 

उपोषणात सेन्ट्रल रेल्वे मजदूर युनियन वरोरा शाखेचाही सहभाग

वरोरा : जुनी पेन्शन योजना लागू करावी व नवीन पेन्शन योजना रद्द करावी या एकमेव मागणीसाठी स्थापित जांइंट फ्रंट रिस्टोरेशन ऑफ ओल्ड पेन्शनचे आदेश व एआयडीईएफ च्या निर्देशानुसार ८ ते११ जानेवारी २०२४ दरम्यान देशातील केंद्रीय कर्मचारी संस्थानांसमोर साखळी उपोषण करीत सरकारचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्नात आहे.

भारतीय रेल्वेची मान्यता प्राप्त ट्रेड युनियन एनएआयआर च्या आवाहनानंतर वरोरा रेल्वे स्टेशन टिकीट घरासमोरील परिसरात मंडप लावून १० जानेवारीला सेन्ट्रल रेल्वे मजदूर युनियन वरोरा शाखेच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करावी व नवीन पेन्शन योजना रद्द करावी यासाठी एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या वतीने नवीन पेन्शन योजनेचा विरोध करीत ‘ सेन्ट्रल रेल्वे मजदूर युनियन जिंदाबाद, जिंदाबाद’ , गो बॅक गो बॅक, एनपीएस गो बॅक ‘, ‘ नही किसीसे भीक मागंते, हम हमारा हक मांगते ‘ , एनपीएस भगाओ,ओपीएस लाओ ‘ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी सेन्ट्रल रेल्वे मजदूर युनियन शाखा वरोरा अध्यक्ष राकेश कुमार, कार्याध्यक्ष विनोद कुमार, सचिव बी.के.भुयान, कोषाध्यक्ष आशिष हरणे, सहसचिव नरेश बारीक, जितेंद्र मधुकर,राकेश देउरकर,आनंद येटे, मालती सेलुकर, सचिन ताजने, मनोज धांडे,अजय शहा, विवेक झाडे इतर अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांना या उपोषणामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे.

*सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी*
३५ वर्ष सेवा देऊनही रेल्वे कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही उलट ५ वर्ष आमदार/ खासदार राहणाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो, हा लाभ त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मिळतो, हा वर्षोनुवर्षे सेवा देणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांवर अन्यायच आहे. यासाठी म्हणून सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांची प्रमुख न्यायोचित मागणी आहे की त्यांचेसाठी भारत सरकारने १/१/२००४ पासून लागू केलेली नवीन पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी.
*बी. के. भुयान*,
*सचिव*
सेन्ट्रल रेल्वे मजदूर युनियन शाखा, वरोरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here