राहुल देवडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

by : Rajendra Mardane

वरोरा : सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून पारिवारिक सदस्यांसह वंचित, दिव्यांग समाज बांधवांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता व आनंदवन मित्र मंडळाचे सदस्य राहुल देवडे, यांचा वाढदिवस वरोऱ्यातील आनंदवन मित्र मंडळ, ओशनिक बहुउद्देशीय संस्था, वरोरा – भद्रावती- चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे संयुक्त विद्यमाने आनंदवनातील सभागृहात स्नेह मीलन कार्यक्रमांतर्गत स्तुत्य उपक्रमांच्या आयोजनांनी सोत्साह संपन्न झाला.
कार्यक्रमात स्वरानंदवनाचे व्यवस्थापक सदाशिवराव ताजने, आनंदवन मित्र मंडळाचे वरोरा अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा समाज कार्यकर्ता राजेंद्र मर्दाने, युवा नेते असिफ रजा, पोद्दार स्कुलचे संचालक सचिन बुरीले, शरद ठेंगणे पत्रकार प्रवीण गंधारे, खेमचंद नेरकर, बोर्डा ग्राम पंचायत सदस्य उमेश देशमुख, आनंदवनाचे कार्यकर्ते दीपक शीव, शौकत खान आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. मुधोळकर म्हणाले की, राहुल देवडे यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून त्या व्यतिरिक्त अन्य क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान आहे.
यावेळी राजेंद्र मर्दाने म्हणाले की, राहुल देवडे यांनी अनावश्यक बाबींना फाटा देत वाढदिवस कार्यक्रम सहस्मरणीय ठरविला. आसिफ रजा यांनी देवडे यांच्या सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तसेच संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांबद्दल गौरवोद्गार काढले.
स्वागताला उत्तर देताना राहुल देवडे म्हणाले की, सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून वंचित समाजबांधवांच्या चेहऱ्यावर हास्य फुलण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याचे काम आनंदवन मित्र मंडळ करीत आहे. माझा वाढदिवस बहुचर्चित दिव्यांग कलाकारांसोबत साजरा करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असे त्यांनी नमूद केले.
स्वरानंदवनातील दिव्यांग कलाकारांनी विविध लोकप्रिय गीत व युगल डान्स सादर करीत देवडे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी केक कापून राहुल देवडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वरानंदवनातील सर्व कलाकार व उपस्थितांनी वाढदिवस स्नेहमिलन अंतर्गत फराळाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात कार्यरत किशोर देवडे, गजानन गायकवाड,आकाश खातरकर, सोनू बहादे, रोशन बहादे, सोनु झाडे, गणेश तांदुळकर, शुभम पवार, मोविन पठाण, मनीष गोचे, ओम राऊत, कशिश निखाडे, रोशन चव्हाण, पंकज ढोके, जितू यादव, त्रिशुल निबुधे, क्रिष्णा क्षीरसागर, अनिकेत चव्हाण इत्यादी आवर्जून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here