,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे विविध उपक्रम राबवत आहेत, त्यांच्या कल्याणकारी कार्यात महिलांना विशेष प्राधान्य देते. त्याचाच एक भाग म्हणून 06 जानेवारी रोजी सुई-धागा या महिला शिलाई प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उदघाटन संयुक्ता लेडीज क्लबच्या अध्यक्षा श्रीमती रचना कंसल व समिती सदस्यांनी केले तसेच श्रीमती रचना कंसल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व सर्व महिलांचे मनोबल वाढवले. सी.एस. आर.माणिकगढ यांनी या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
यामध्ये गडचांदूर बैलमपूर, मानोली, थुट्रा या गावातील एकूण 15 महिला सहभागी झाल्या होत्या. हे प्रशिक्षण दररोज ३ तास चालणार असून एकूण सहा महिने चालणार आहे. त्यासाठी गडचांदूर येथील अनुभवी प्रशिक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे . प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात, सर्व लाभार्थ्यांना परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच महिलांशी संबंधित अशा प्रशिक्षणाला चालना देण्याचे आश्वासन दिले.