,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन.देऊळगाव राजा.👉प्रा.आशोक. डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
देऊळगाव राजा शहरात व ग्रामीण भागात भर दिवसा होत असलेल्या चोऱ्या व घरफोडी ला पोलीस विभागाने तात्काळ आळा घालून भुरट्या चोरांना अटक करून कारवाई करण्याची मागणी देऊळगाव राजा महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी (दि,5) पोलीस स्टेशन ला निवेदन सादर केले,
देऊळगाव राजा शहर व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा व रात्री घरफोडी होत आहेत,आठवडी बाजारात मोबाईल चोरी होत आहे, रस्त्यावरील दुचाकीची चोरी होत आहे, धान्य गोडाऊन फोडले जात आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे,
पोलीस विभागाने या प्रकरणी गंभीरपणे विचार करून पोलीस ग्रस्त वाढवावी व चोऱ्या वर आळा घालावा अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे
सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे यांनी निवेदन स्वीकारले याप्रसंगी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गजानन काकड,शहर अध्यक्ष विष्णू झोरे,मा नगरसेवक हनिफ शाह,प्रा अशोक डोईफोडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विजय खांडेभराड,शिवसेनेचे शहर प्रमुख गोविंदराव झोरे,अजय शिवरकर,मुन्ना ठाकूर,,वसंतराव खुळे,मंगेश तिडके,किशोर नामदार,गिरीश वाघमारे,मा सरपंच गजानन घुगे,तथा इतर उपस्थित होते,