By : Priyanka Punvatkar
चंद्रपूर : भावसार समाज महिला फाउंडेशन चंद्रपूरच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी श्री संजय जी पवार चंद्रपूर यांना मराठा समाजाला आरक्षण देण्यास हरकत नाही परंतु ओबीसी आरक्षणातून देण्यात येऊ नये, असे निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष योगिता धनेवार, अभिलाषा मैंदळकर, प्रीती लखदिवे, मीनाक्षी आलोने कांता दखणे, डॉ. नंदकिशोर मैंदळकर, बबन धानेवार, निकेश पेटकर, प्रदीप गोविंदवार,मोहन जिवतोडे,आदी समाज बांधव उपस्थित होते. इतर मागास वर्गात एकूण 346 जाती आहेत त्यात 37 मुस्लिम जाती पण आहेत. राज्यात एकूण ओबीसींची संख्या 27% आहे मात्र आरक्षण 19% देण्यात येत आहे. ओबीसींना जाती-गणनेनुसार 27% आरक्षण देण्यात यावे हे अपेक्षित होते. त्यात मराठा समाजाचा १० टक्के लोकसंख्येचा भार का सहन करायचा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास मराठा समाजातील १० टक्के लोकसंख्येचा भार ओबीसी आरक्षणावर पडेल व ओबीसी वर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघ जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी आपल्या जीवाची परवाना करता आमरण उपोषण सुरू केले ओबीसींना जागविण्याकरीता आम्ही त्यांच्या सदैव पाठीशी आहोतच परंतु ओबीसी नेतेच स्वतःच्या स्वार्थाकरिता त्यांना विसरलेले दिसतात. कुठे पोहोचले मनोज जरांगे पाटील, कुठे आहेत रवींद्र टोंगे पाटील. (त्यांनी आपले प्राण पणाला लावले होते सांगा कोणासाठी लढायचे)हीच ओबीसींची खरी समस्या आहे. न्यायमूर्ती खत्री आयोग व न्यायमूर्ती बापट आयोगाने आरक्षण नाकारले होतेच. तेव्हा सदर आयोगाचाही विचार होणे गरजेचे आहे. आम्ही मराठा समाजास आरक्षण देण्याच्या विरोधात नाही. त्यांना आरक्षण शासनाने खुशाल द्यावे परंतु ओबीसीच्या कोट्याला न हात लावता आरक्षण देण्यात यावे.